‘मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की फक्त मुंबईचे?’; भाजपचा सवाल

देशातील कोरोनाग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहिले नाही. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

‘मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की फक्त मुंबईचे?’; भाजपचा सवाल

देशातील कोरोनाग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहिले नाही. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दांडी मारली मात्र आज बीएमसीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तब्यतीचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठीकाल हजर राहिले नाही, मात्र दुसऱ्या दिवशी पालिकेच्या लहानश्या ऍपच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे अवघ्या १० ते १२ तासांमध्ये कोणती जादूची कांडी फिरली, असा सवाल भाजप नते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

‘प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही’ – मुख्यमंत्री

दरम्यान विरोधक करत असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. मुंबई पालिकेत खुट्ट झाले की, प्रश्नांचा भडीमार केला जातो. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. त्यामुळे प्रश्न विचारणे सोपे असेत. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number