मुलींना विकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

गरजू मुलींसोबत मैत्री करून नोकरीचे आमिष देत त्यांना गुजरातमध्ये नेऊन विकणाऱ्या महिलेसह आरोपींना नागपूर एमआयडीसी पोलिसांना ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार १६ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीचा तपास पोलीस करत असताना माहिती समोर आली की, पीडित मुलीच्या घरची परिस्थिती बेताची होती. या गोष्टीचा […]

मुलींना विकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

गरजू मुलींसोबत मैत्री करून नोकरीचे आमिष देत त्यांना गुजरातमध्ये नेऊन विकणाऱ्या महिलेसह आरोपींना नागपूर एमआयडीसी पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार १६ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीचा तपास पोलीस करत असताना माहिती समोर आली की, पीडित मुलीच्या घरची परिस्थिती बेताची होती. या गोष्टीचा फायदा घेत, मैत्रिणीच्या साहाय्याने तीला गुजरातमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने आरोपी विशाखा प्रदीप बिस्वास हीने तीला गुजरमध्ये नेऊन ३५ वर्षीय इसमाला १ लाख रुपयांना विकले. तसेच विक्रीचा व्यवहार झाल्याचा संशय येऊ नये म्हणून अल्पवयीन पीडितेचे त्या इसमासोबत लग्नदेखील लावून दिले.

पोलिसांच्या तपासात ही माहिती मिळताच, पोलिसांनी आरोपी विशाखाला ताब्यात घेऊन गुजरातमध्ये जाऊन पीडित मुलीची सुटका केली. तर इतर ३ आरोपींना ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलिसांनी या आरोपींवर अपहरणाच्या कलमासह अत्याचार, बालविवाह कायदा, तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number