Yuvraj Singh: ‘निवृत्तीसाठी माझ्यावर दबाव आणला गेला’; शारीरिक चाचणी आणि टीम मॅनेजमेंटबद्दल युवराज सिंगचा धक्कादायक खुलासा

संवादाअभावी युवराजने खंत व्यक्त केली, तर यो-यो टेस्टवरून निवृत्तीचा दबाव आणल्याचाही आरोप त्याने केला आहे.

Yuvraj Singh: ‘निवृत्तीसाठी माझ्यावर दबाव आणला गेला’; शारीरिक चाचणी आणि टीम मॅनेजमेंटबद्दल युवराज सिंगचा धक्कादायक खुलासा

मुंबई: भारतीय क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये त्याच्या कारकिर्दीतील संवेदनशील टप्प्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, त्याला संघातून बाहेर ठेवण्याचा निर्णय थेट महेंद्रसिंह धोनी याने फोन करून कळवला होता. विशेष म्हणजे, त्या वेळी धोनी कर्णधार नव्हता, तरीही त्याने परिस्थितीची माहिती देत स्पष्टता दाखवली.

युवराजने सांगितले की, त्या काळात टो संघात खेळत होता, मात्र त्याच्याशी थेट संवाद साधला गेला नाही. त्याने स्पष्ट केले की त्या वेळचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी त्याच्याशी कोणतीही स्पष्ट चर्चा केली नाही. “मी देशासाठी इतके क्रिकेट खेळलो, किमान मला स्पष्टपणे सांगितले गेले असते तर बरे झाले असते,” अशी खंत त्याने व्यक्त केली आहे.

युवराज पुढे म्हणाला की, “मी त्या काळात खूप गोंधळलेल्या स्थितीत होतो. संघ व्यवस्थापनाकडून कोणतीही स्पष्टता मिळत नव्हती. मात्र धोनीने मला फोन करून सांगितले की निवड समिती आता माझ्याकडे पाहत नाही आणि मी त्यांच्या भविष्यातील योजनांचा भाग राहिलेलो नाही.” या संवादामुळे त्याला परिस्थिती समजून घेण्यास मदत झाली, असेही नमूद केले.

हेही वाचा: Sunetra Pawar : जयची प्रमुखपदी नियुक्ती, तटकरे-पटेल यांची दिल्लीत भेट, तर दौऱ्यानंतर पहिला फोन उद्धव ठाकरेंना; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजकीय हालचालींना वेग

युवराज सिंगने आणखी एक धक्कादायक खुलासा करत सांगितले की, फिटनेसच्या मुद्द्यावरून त्याच्यावर निवृत्तीचा दबाव आणला गेला. “यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्यास मला निवृत्तीचा विचार करावा लागेल, असे मला सांगण्यात आले होते,” असे त्याने सांगितले. मात्र यावर ठाम भूमिका घेत, “निवृत्तीचा निर्णय हा माझा स्वतःचा असेल, तो कुणाच्या सांगण्यावर होणार नाही,” असे त्याने स्पष्ट केले.

युवराजने पुढे सांगितले की, संघात खेळवायचे की नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा असतो, पण एखाद्या खेळाडूला निवृत्तीबाबत दबाव टाकणे योग्य नाही. या संपूर्ण अनुभवाने त्याला मानसिकदृष्ट्या कठीण काळातून जावे लागले, मात्र त्याने त्याची भूमिका ठामपणे मांडली.

युवराज सिंगच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्या काळातील भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयप्रक्रियेवर चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या या खुलाशामुळे क्रिकेट विश्वात नव्याने वाद आणि चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा: Madha Anjangaon Controversy: माढा 'अंजनगाव'मधील पुतळ्यासंदर्भातील वाद मिटला! लक्ष्मण हाकेंनी घेतले आंदोलन मागे; पाहा काय निघाला तोडगा?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number