कुस्तीपटू नरेश टिकैत यांनी काढली समजूत

मुंबई, ३१ मे २०२३, प्रतिनिधी :  भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी समजूत काढल्यानंतर कुस्तीपटूंनी पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत महिला कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. खासदार […]

कुस्तीपटू नरेश टिकैत यांनी काढली समजूत

मुंबई, ३१ मे २०२३, प्रतिनिधी :  भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी समजूत काढल्यानंतर कुस्तीपटूंनी पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत महिला कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर या कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

कुस्तीपटूंसोबत चर्चेनंतर टिकैत यांनी केंद्र सरकारला कारवाईसाठी 5 दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. टिकैत यांनी त्यांच्याकडून पदकांची बॅगही घेतली आहे. ही बॅग ते राष्ट्रपतींना देणार असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे. सर्व खेळाडू हरिद्वारहून घरी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट सुमारे तासभर हरिद्वारमध्ये गंगा किनारी पदके धरून रडत बसले होते.

कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला सरकारकडून कोणतीही दाद देण्यात येत नसल्याने कुस्तीपटूं उद्वीग्न झाले. कुस्तीपटूंनी उद्वीग्न होत मिळालेली ऑलिम्पिकची पदकं हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ते गंगा नदीच्या तिरावर दाखलही झाले होते. मात्र, गंगा नदीच्या पात्रात ऑलिम्पिकची पदकं विसर्जित करण्याचा निर्णय तुर्तास मागे घेतला आहे. दरम्यान, ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनावर मोर्चा काढला होता. यावर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते. तर, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरून कुस्तीपटूंचा तंबूही हटवला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number