WPL 2026 Final Match: आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा ‘फायनल महामुकाबला’; अशी असेल दोन्ही संघांची संभाव्य ‘Playing 11’

दिल्ली कॅपिटल्ससाठी ही फायनल काही नवीन नाही. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामापासून (2023) दिल्ली प्रत्येक वेळी फायनलमध्ये पोहोचली आहे.

WPL 2026 Final Match: आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा ‘फायनल महामुकाबला’; अशी असेल दोन्ही संघांची संभाव्य ‘Playing 11’

नवी दिल्ली: महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2026, Women’s Premier League) चौथ्या पर्वातील एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा सात विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता WPL 2026 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुशी होणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवून आरसीबीने थेट फायनलमध्ये प्रवेश केला होता.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु ही दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून आरसीबीने आपले पहिले WPL जेतेपद पटकावले होते. यंदाच्या हंगामात आरसीबीने आठ पैकी सहा सामने जिंकत पॉइंट्स टेबलमध्ये टॉप स्थान मिळवले. आरसीबीचे केवळ दोन पराभव झाले असून, त्यापैकी एक पराभव दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झाला होता.

दिल्ली कॅपिटल्ससाठी ही फायनल काही नवीन नाही. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामापासून (2023) दिल्ली प्रत्येक वेळी फायनलमध्ये पोहोचली आहे. मात्र आजवर दिल्लीला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे यंदाचा फायनल सामना दिल्लीसाठी पहिल्या किताबाचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.

हेही वाचा: T20 World Cup : 'ही सर्वात डेंजर टीम.. मला भीती वाटतेय..' MS Dhoniची सूर्याला 'वॉर्निंग'! पाहा 'थाला'ने काय दिला सल्ला?

आरसीबीची संभाव्य संघ 

ग्रेेस हॅरिस, स्मृती मंधाना (कर्णधार), जॉर्जिया वोल, ऋचा घोष, राधा यादव, नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, लॉरेन बेल, सयाली सतघारे.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य संघ 

लिझेल ली, शेफाली वर्मा, लॉरा वोलवार्ड, जेमिमा रोड्रिग्ज (कर्णधार), निकी प्रसाद, मरिझान कॅप, चिनेल हेन्री, स्नेह राणा, नल्लापुरेड्डी चरणी, मिन्नू मनी, नंदिनी शर्मा.

अंतिम सामना कधी आणि कुठे होणार?

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील WPL 2026 फायनल सामना गुरुवार, 5 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना बीसीए स्टेडियम, कोटांबी (वडोदरा) येथे होणार आहे. सामना सायंकाळीसाडे सात वाजता सुरू होईल, तर टॉस सात वाजता होणार आहे.

महिला प्रीमियर लीग 2026 च्या फायनल सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Star Sports Network वर केले जाईल. तसेच या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar App वर उपलब्ध असेल. एकूणच, WPL 2026 चा फायनल सामना अत्यंत रंगतदार ठरण्याची शक्यता असून, आरसीबी आपले विजेतेपद कायम राखते की दिल्ली कॅपिटल्स इतिहास रचत पहिले जेतेपद जिंकते, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Rahul Gandhi On Ravneet Singh Bittu: 'गद्दार मित्रा, तू परत काँग्रेसमध्ये येशील…'; राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेच्या मकर द्वारावर हायव्होल्टेज ड्रामा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number