जागतिक कुस्तीसंघटनेचा महिला कुस्तीपटूंना पाठिंबा

कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल युनाइटेड वर्ल्ड रेस्लिंग म्हणजेच जागतिक कुस्ती महासंघाने घेतली आहे. कुस्तीपटूंच्या सर्वोच्च संस्थेने भारतीय कुस्ती महासंघाला बरखास्त करण्याचा इशारा दिला आहे. कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आंदोलन महिला पहेलवान करत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर खेळाडूंच्चा लैंगिक शोषणाचा आरोप आहे.रविवारी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांना पोलिसांनी […]

जागतिक कुस्तीसंघटनेचा महिला कुस्तीपटूंना पाठिंबा

कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल युनाइटेड वर्ल्ड रेस्लिंग म्हणजेच जागतिक कुस्ती महासंघाने घेतली आहे. कुस्तीपटूंच्या सर्वोच्च संस्थेने भारतीय कुस्ती महासंघाला बरखास्त करण्याचा इशारा दिला आहे. कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आंदोलन महिला पहेलवान करत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर खेळाडूंच्चा लैंगिक शोषणाचा आरोप आहे.रविवारी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांना पोलिसांनी जबरदस्तीने हटवले. यासोबतच दिल्ली पोलिसांनी विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि इतर कुस्तीपटूंच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटू मंगळवारी गंगा नदीवर आपली पदके विसर्जित करण्यासाठी पोहोचले होते, परंतु भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांच्या विनंतीनंतर त्यांनी आपला निर्णय तूर्तास मागे घेतला आहे . केंद्र सरकारला कारवाईसाठी आता ५ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number