मसूरी : भारताचा क्रिकेटपटू कुलदीप यादव याने आज, शनिवारी उत्तराखंडमधील मसूरी येथे आपल्या बालपणाची मैत्रिण वंशिका हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. उत्तराखंडमधील मसूरी येथील सॅव्हॉय हॉटेलमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. या समारंभासाठी हे हॉटेल २-३ दिवसांकरता बुक करण्यात आले आहे. कुलदीपच्या लग्नाला क्रिकेट जगतातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये तिलक वर्मा, युजवेंद्र चहल, रिंकू सिंग आणि टी. दिलीप यांच्यासह अनेक स्टार भारतीय क्रिकेटपटू आणि इतर व्हीआयपी पाहुण्यांचा समावेश होता.
World champion Indian cricket team’s star spinner Kuldeep Yadav tied the knot with Vanshika today in Mussoorie, Uttarakhand. pic.twitter.com/kCcIAJ9a1d — ANI (@ANI) March 14, 2026