‘आप’च्या निकटवर्तीयाकडून महिलेची छेडछाड

दिनांक २० / ०१ / २०२३, प्रतिनिधीकडून, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष यांची छेड काढण्यात आली असून आरोपी आम आदमी पार्टीचा निकटवर्तीय असल्याची, माहिती समोर येत आहे. गुरुवारी २० जानेवारी २०२३ रोजी पहाटे पावणे तीनच्या सुमारास दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल या एम्स जवळील फुटपाथवर असताना हरीश चंद्रा या मद्यधुंद गाडी चालकाने मालीवाल यांची छेडछाड […]

‘आप’च्या निकटवर्तीयाकडून महिलेची छेडछाड

दिनांक २० / ०१ / २०२३, प्रतिनिधीकडून,

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष यांची छेड काढण्यात आली असून आरोपी आम आदमी पार्टीचा निकटवर्तीय असल्याची, माहिती समोर येत आहे.
गुरुवारी २० जानेवारी २०२३ रोजी पहाटे पावणे तीनच्या सुमारास दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल या एम्स जवळील फुटपाथवर असताना हरीश चंद्रा या मद्यधुंद गाडी चालकाने मालीवाल यांची छेडछाड केल्याचा आणि त्यांना ओढत नेल्याची घटना घडली आहे.

‘दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी मी गेल्यानंतर एका मद्यधुंद गाडी चालकाने माझ्याशी छेडछाड केली, मी त्याला पकडले त्यावेळी त्याने गाडीच्या खिडकीमध्ये हात अडकवला आणि मला ओढत नेलं. देवाने जीव वाचवला. जर दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील तर परिस्थितीची कल्पना करा.’ असे ट्विट करत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणाची माहिती दिली.

या गंभीर घटनेप्रकरणी ४७ वर्षीय हरीश चंद्रा या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी आम आदमी पक्षाच्या नेत्याचा निकटवर्तीय आहे त्यामुळे आता दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार असताना आम आदमी पार्टी या आरोपीवर काही कारवाई करणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number