युगांडाच्या महिलेला अंमली पदार्थांसह अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर युगांडाच्या एका महिलेला ४९ कॅप्सूल, ५३५ ग्रॅम हेरॉईन आमि १५ कॅप्सूलमध्ये १७५ ग्रॅम अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या शरिरात अंमली पदार्थ लपवून ठेवण्यात आले होते. या अंमली पदार्थांची बाजारातील किंमत ३ कोटी रुपये इतकी आहे. हे अंमली पदार्थ बाहेर काढण्यासाठी […]

युगांडाच्या महिलेला अंमली पदार्थांसह अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर युगांडाच्या एका महिलेला ४९ कॅप्सूल, ५३५ ग्रॅम हेरॉईन आमि १५ कॅप्सूलमध्ये १७५ ग्रॅम अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या शरिरात अंमली पदार्थ लपवून ठेवण्यात आले होते. या अंमली पदार्थांची बाजारातील किंमत ३ कोटी रुपये इतकी आहे. हे अंमली पदार्थ बाहेर काढण्यासाठी त्या महिलेला भायखळा येथील शासकीय जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिलेच्या तपासादरम्यान तिच्या सामानात काहीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. महिलेची कसून चौकशी केली असता महिलेने कबूल केले की, तिच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे चिकट टेप वापरून ११ कॅप्सूल लपवलेल्या होत्या. ११० ग्रॅम हेरॉइन असलेल्या किमान १० कॅप्सूल महिलेच्या शरिरातून काढण्यात आल्या. तर उर्वरित कॅप्सूल काढण्यासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number