WhatsApp update: व्हॉट्सॲपचा नवा धमाका! आता तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता शेड्यूल; नवीन फिचर कसे वापरायचे जाणून घ्या

व्हॉट्सॲपने नवीन शेड्यूल मेसेज फीचर लाँच केले आहे.

WhatsApp update: व्हॉट्सॲपचा नवा धमाका! आता तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता शेड्यूल; नवीन फिचर कसे वापरायचे जाणून घ्या

WhatsApp update: इन्स्टंट मेसेजिंग ॲप्सच्या युगात व्हॉट्सॲप (WhatsApp) ने पुन्हा एकदा वापरकर्त्यांसाठी एक सोपी आणि उपयुक्त सुविधा आणली आहे. आता तुम्ही तुमचे मेसेजेस आधीच शेड्यूल करू शकणार आहात, म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगासाठी किंवा रात्री उशिरा शुभेच्छा पाठवायच्या असतील, तर तुम्हाला जागे राहण्याची गरज नाही.

शेड्यूल फीचर कसे काम करेल?

वापरकर्त्यांना फक्त मेसेज टाइप करावा लागेल आणि नंतर तारीख व वेळ ठरवता येईल. ठरवलेली वेळ येताच मेसेज आपोआप पाठवला जाईल. यामध्ये ॲप उघडण्याची किंवा काही अतिरिक्त टॅप करण्याची गरज नाही. शेड्यूल केलेले मेसेजेस एक खास विभागात दिसतील. तेथे पाहता येईल की किती मेसेजेस शेड्यूल केले आहेत, आणि हव असल्यास त्यांना संपादित किंवा रद्द करता येईल. यामुळे तुम्हाला तुमच्या मेसेजेसवर पूर्ण नियंत्रण राहते.

हेही वाचा: Google Play Store: तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का हे अ‍ॅप? गुगलने 17.5 लाख अ‍ॅप्सवर घातली बंदी

हटवलं तर कोणालाही कळणार नाही

हे फीचर आणखी खास आहे कारण, जर तुम्ही शेड्यूल केलेला मेसेज पाठवण्यापूर्वी हटवला, तर प्राप्तकर्त्याला कोणतीही सूचना मिळणार नाही. म्हणजे चुकीच्या वेळेला पाठवण्याची भीती नाही.

हेही वाचा: AI Drinking Water : AI मुळे जगावर जलसंकट? गुगलचे डेटा सेंटर्स दरवर्षी पितायत 6.1 अब्ज गॅलन शुद्ध पाणी; नोकऱ्यांनंतर आता पाणीही..

वैयक्तिक आणि गट चॅट्समध्ये काम करेल

ही सुविधा फक्त वैयक्तिक चॅटसाठी नाही तर ग्रुप चॅट्समध्येही वापरता येईल. त्यामुळे एखाद्या मित्रांच्या गटात महत्त्वाची माहिती किंवा शुभेच्छा पाठवायच्या असतील, तर तुम्ही आधीच सर्व मेसेजेस शेड्यूल करू शकता. व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरमुळे वापरकर्त्यांना रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची गरज नाही, आणि महत्वाचे मेसेजेस वेळेत पाठवता येतील. ही सुविधा लवकरच बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे आणि नंतर सगळ्यांनाच मिळेल, असा अंदाज आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number