तो आला अन् त्याने..; मराठमोळी अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?

सद्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय. कधी काय ऐकायला येईल हे सांगता येत नाही. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातारण पाहायला मिळते.

तो आला अन् त्याने..; मराठमोळी अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?

मुंबई: सद्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय. कधी काय ऐकायला येईल हे सांगता येत नाही. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातारण पाहायला मिळते. आजच्या या आधुनिक जगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. तरीही आज कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत. त्यातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितलाय. मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहनकर हिने तिच्या सोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितलाय. 

नेमकं घडलं काय? 

"दादर स्थानकाहून एकदा लोकलमधून प्रवास करताना मी फर्स्टक्लास डब्ब्यात चढले. महिलांच्या फर्स्ट क्लासमध्ये छोट्या शाळकरी मुलांनी आलेलं चालतं. तर काही लहान मुलंही डब्यात चढली. तेव्हा मी साधारणतः अकरावीत शिकत होते. माझ्यासमोर डब्यात एक मुलगा उभा होता. दादरवरुन जशी ट्रेन निघाली, त्यानं माझ्या छातीला हात लावला… ही घटना भर दिवसा सकाळी अकरा वाजता माझ्यासोबत घडली." 

Milk Price Hike: सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली; दुधाचे दर वाढले

"माझ्यासोबत जेव्हा हे सगळं घडत होतं, त्यावेळी मी कुर्ता घातला होता. त्यामुळे मी काही अशातशा कपड्यांत नव्हतेच. समोरच्या मुलाचा असा काही हेतू असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मला धक्काच बसला. मी पुढच्याच स्टेशनला उतरले आणि पोलीस स्थानकात गेले. पण, त्यावेळी पोलिसांनी दिलेली प्रतिक्रिया शॉकिंग होती.", असं अदिती पोहनकर म्हणाली. 

'काही झालं नाही ना तुम्हाला, आता कुठे त्याला शोधणार?", असं म्हणत पोलिसांनी मला उडवून लावलं, असं अदितीनं सांगितलं. तेवढ्यात पोलीस स्टेशनजवळच तो मुलगा मला पुन्हा दिसला. मी ज्यावेळी त्याला पाहिलं, त्यावेळी तो दुसऱ्या मुलीसोबतही तसंच काहीसं करण्याच्या तयारीत होता. मी त्याला ओळखलं… मी पोलिसांना जाऊन सांगितलं, हाच तो मुलगा… पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नानं पुन्हा एकदा मला धक्का बसला. पोलिसांनी माझ्याकडे पुरावा मागितला. मी विचारलं, पुरावा कशाला हवा? त्यानं माझ्यासोबत ते कृत्य केलंय म्हटल्यावर मला माहीत असणारच ना…" 

मी वैतागल्यावर एक महिला पोलीस कॉन्स्टेबल माझ्यासोबत आली. तिनं त्या मुलाला जाब विचारला. तर त्या मुलानं आपण असं काहीच केलेलं नाही, असं सांगत स्पष्ट नकार दिला. त्यावेळी तिथेच माझ्यात दुर्गा संचारल्यासारखं झालं. मी त्याच्यावर जोरात ओरडले. माझ्या आवाज ऐकून तो घाबरला आणि लगेच 'हो हो, मी केलं' असं म्हणाला. मी त्याची कॉलर पकडली आणि 'परत कोणासोबत करशील?' असं विचारलं. त्याला पोलिसांकडे दिलं. मी त्याच्यावर ओरडले नसते तर त्याने मान्यच केलं नसतं." असा धक्कादायक खुलासा मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहनकर हिने केलाय. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number