रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. यापुर्वी रांचीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 17 धावांनी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. यादरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
यावेळी किंग कोहली पुन्हा एकदा आपल्या आक्रमक खेळीसह चमकलेला पाहायला मिळाला. विराट कोहलीने तब्बल दोन वर्षांनंतर दुसरी सेच्युरी मारली आहे. टीम इंडियाच्या विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. मात्र या सेंच्युरीमुळे तो न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या विक्रमाच्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे.
यापुर्वी न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने देखील दक्षिण अफ्रिकेविरूद्ध वनडेत तीन शतकं ठोकली आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या वनडेमध्ये पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केल्यानंतर रायपूर वनडे सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा सलग दुसरं शतक ठोकलं आहे. विराट कोहलीने त्याचा 111.11 चा स्ट्राईक रेट असताना 90 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या.
त्यावेळी त्याच्यासोबत ऋतुराज गायकवाडने 105 धावांच दमदार शतक पुर्ण करत विराट कोहलीला चांगली साथ दिली. विराट कोहलीने 83 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकार मारत 105 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 250 पार धावा करता आल्या. दरम्यान या शतकासह विराट कोहलीने वनडेतील 53वं आणि आंतरराष्ट्रीय 84वं शतक ठोकलं आहे. तसेच वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये कोलकात्यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नाबाद 1-0, रांची वनडे 2025 सामन्यात 135 आणि रायपूर वनडे 2025 सामन्यात 105 धावा केल्या.