Virat Kolhi: विराट-अनुष्काचा क्युट फोटो आणि तासात 40 लाख लाईक्स; 2026 ची ‘विराट’सुरुवात

विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत नववर्ष 2026 चे स्वागत करत सोशल मीडियावर लक्ष वेधले.

Virat Kolhi: विराट-अनुष्काचा क्युट फोटो आणि तासात 40 लाख लाईक्स;  2026 ची ‘विराट’सुरुवात

नवी दिल्ली: नवीन वर्ष नव्या आशा घेऊन येते आणि 2026 ची सुरुवात क्रिकेट चाहत्यांसाठी खास ठरणारी दिसत आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत नववर्षाचे स्वागत केले. विराटने इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर करत, “माझ्या आयुष्यासोबत 2026 मध्ये प्रवेश @anushkasharma” असे लिहिले. या पोस्टला अवघ्या एका तासात सुमारे 40 लाख लाईक्स मिळाले आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

सध्या विराट कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत असला, तरी लवकरच तो पुन्हा मैदानात परतणार आहे. तो विजय हजारे  ट्रॉफी आणि भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, विराट एका ऐतिहासिक जागतिक विक्रमापासून केवळ 25 धावा दूर आहे, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावा पूर्ण करण्यासाठी विराटला फक्त 25 धावांची गरज आहे. हे यश मिळवल्यास तो जगातील सर्वात वेगवान फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे, ज्यांनी 644 डावांमध्ये 28,000 धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा याने 666 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. विराटने आतापर्यंत केवळ 623 डावांमध्ये 27,975 धावा केल्या असून, तो हा विक्रम मोडण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे.

हेही वाचा: Pune Election 2026: राजकारणात आता कागदही पचवावे लागतात; उमेदवारीसाठी चक्क प्रतिस्पर्ध्याचा ‘बी’ फॉर्म गिळला, पुण्यात निवडणूक कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारी पासून सुरू होणार आहे. याच मालिकेत विराट हा ऐतिहासिक टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधी विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना विराटने जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. पहिल्या दोन सामन्यांत त्याने 131 आणि 77 धावांची दमदार खेळी केली.

याशिवाय, विराट कोहलीने List A Cricket मध्येही नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तो सर्वात जलद 16,000 List A धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी 330 डावांमध्ये केली, तर सचिन तेंडुलकर यांना यासाठी 391 डावे खेळावे लागले होते.

BCCI च्या सूत्रांनुसार, भारतीय वनडे संघ 8 जानेवारी पर्यंत वडोदरा येथे एकत्र येणार आहे. मात्र विराट कोहली सरावासाठी एक दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 जानेवारीपासून सुरू होणारी ही मालिका क्रिकेट इतिहासात खास आणि संस्मरणीय ठरण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: New Mumbai Airport: कोट्यवधींचे विमानतळ, पण साधा कॉल लागेना; नवी मुंबई ऑनलाईन पेमेंटसाठी प्रवाशांची धावपळ, काय आहे कारण?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number