भारताच्या क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण आता ‘या’ अॅपवर होणार

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बीसीसीआयकडून क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे अधिकार पाच हजार ९६३ कोटी रुपयांना व्हायकॉम १८ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खरेदी केले आहेत. कंपनीने सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल प्रक्षेपणाचे अधिकार खरेदी केले आहेत. व्हायकॉम १८ प्रायव्हेट लिमिटेड आणि जिओ सिनेमा यांनी संयुक्तपणे क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे अधिकार विकत घेतले आहेत. यामुळे भारतीय संघाच्या सर्व क्रिकेट […]

भारताच्या क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण आता ‘या’ अॅपवर होणार


मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बीसीसीआयकडून क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे अधिकार पाच हजार ९६३ कोटी रुपयांना व्हायकॉम १८ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खरेदी केले आहेत. कंपनीने सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल प्रक्षेपणाचे अधिकार खरेदी केले आहेत. व्हायकॉम १८ प्रायव्हेट लिमिटेड आणि जिओ सिनेमा यांनी संयुक्तपणे क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे अधिकार विकत घेतले आहेत. यामुळे भारतीय संघाच्या सर्व क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण हॉटस्टार आणि जिओ सिनेमा या दोन मोबाईल अॅपवर होणार आहे. तसेच सामन्यांचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर होणार आ

व्हायकॉम १८ ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार, जिओ सिनेमा ही मोबाईल अॅप तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्क ही व्हायकॉम १८ ची उत्पादने आहेत. व्हायकॉम १८ कंपनीकडे भारताच्या २०२८ पर्यंतच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे अधिकार आहेत. यात २५ कसोटी, २७ एकदिवसीय आणि ३६ टी २० अशा एकूण ८८ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त व्हायकॉम १८ कंपनीकडे आयपीएल आणि डब्ल्यूपीएलचे २०२७ पर्यंतच्या सर्व सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे अधिकार आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या २०२४ ते २०३१ पर्यंतच्या सर्व सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे अधिकार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number