वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरून हटवलं

मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मनसेत मुसलमानांचे नाराजी नाट्य सुरू आहे. मनसेचे अनेक मुस्लिम नेते राजीनामे देत आहेत. दरम्यान, मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. वसंत मोरे यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे राज ठाकरे मोरेंवर नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, आता वसंत मोरे […]

वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरून हटवलं

मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मनसेत मुसलमानांचे नाराजी नाट्य सुरू आहे. मनसेचे अनेक मुस्लिम नेते राजीनामे देत आहेत. दरम्यान, मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. वसंत मोरे यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे राज ठाकरे मोरेंवर नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, आता वसंत मोरे यांना पुणे शहर अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. तर यापदी मनसेने साईनाथ बाबर यांची नियुक्ती केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील अनधिकृत भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरेंच्या वक्तव्याचे काही भाजप नेत्यांकडून स्वागत करण्यात आले. मात्र, मनसेच्या अनेक मुसलमान नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी ठाकरेंच्या या वक्तव्यावर वेगळी भूमिका मांडली होती. या कारणामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या साईनाथ बाबर यांची निवड केली आहे.

मनसेच्या अधिकृत ट्विटरवरून साईनाथ बाबर यांना पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मनसेतर्फे ट्विट करण्यात आले की, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number