‘लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम होतील’ – राजेश टोपे

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून राज्यात सुरू झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी मुलांच्या लसीकरणासाठी केंद्रे उभारण्यात आली आहेत. दरम्यान जालन्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम होतील, असे राजेश टोपे म्हणाले. राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात […]

‘लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम होतील’ – राजेश टोपे

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून राज्यात सुरू झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी मुलांच्या लसीकरणासाठी केंद्रे उभारण्यात आली आहेत. दरम्यान जालन्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम होतील, असे राजेश टोपे म्हणाले.

राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली असून आता केंद्राकडे १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांच्या वयोगटातील लसीकरणाची मागणी केली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना, ओमायक्रॉन रुग्ण वाढले असले तरी लॉकडाऊनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत राज्यांना समान निकष असायला हवे, राजेश टोपे म्हणाले. तसेच मुलांची लसीकरण मोहिम शाळेत राबवणार होते, परंतु मुलांना लसीकरण केल्यावर त्रास झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे दवाखान्यातच लसीकरण मोहिम रावण्यात आली असल्याचे टोपे यांनी सांगितले.

कोल्हापूरात मुलांमध्ये उत्साह

कोल्हापूरमध्ये मुलांच्या लसीकरणाला सुरवात झाली असून मुलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी लसीकरण केंद्रावर भेट दिली. यावेळी जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार मुलांचे लसीकरण होणार असून महापालिका हद्दीतील २८ हजार मुलांचे दहा दिवसांत लसीकरण पूर्ण होणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number