T20 World Cup आधी टीम इंडियाला मोठा धक्का; नाश्ता केला अन् अचानक…; राजकोटमध्ये नेमकं काय घडलं?

विविध तपासण्या व स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. वैद्यकीय अहवालानुसार त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान तीन ते चार आठवडे लागू शकतात.

T20 World Cup आधी टीम इंडियाला मोठा धक्का; नाश्ता केला अन् अचानक…; राजकोटमध्ये नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली: आयसीसी टी20 विश्वचषकाआधी भारतीय क्रिकेट संघासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. संघाचा महत्त्वाचा फलंदाज तिलक वर्मा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिलक वर्माला पोटाच्या भागात (Abdominal Injury) गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) करावी लागणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतही त्याचा सहभाग संशयात आहे.

ही दुखापत राजकोटमध्ये विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी गेले असताना झाली. बुधवारी सकाळी नाश्त्यानंतर तिलकला अचानक तीव्र पोटदुखी जाणवू लागली. त्यानंतर त्याने बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधील डॉक्टरांशी सल्लामसलत केली. तातडीने त्याला राजकोटमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विविध तपासण्या व स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. वैद्यकीय अहवालानुसार तिलकला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान तीन ते चार आठवडे लागू शकतात.

हेही वाचा: Mahesh Manjrekar on Mumbai : 'मुंबईकरांचा श्वास कोंडतोय…'; ठाकरे बंधूंसमोर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली दोन कोटी जनतेची खदखद

या पार्श्वभूमीवर 21 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत – न्यूझीलंड टी20 मालिकेतील सुरुवातीचे सामने तिलक खेळू शकणार नाही, असे स्पष्ट संकेत आहेत. मात्र, भारतीय संघाची खरी चिंता पुढील महिन्यात 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ICC T20 World Cup बाबत आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध आहे, त्यामुळे तिलक त्या सामन्याला अनुपस्थित राहिला तरी संघावर फार मोठा परिणाम होणार नाही, असे मानले जात आहे.

दरम्यान, तिलक वर्मा दुखापतीमुळे बाहेर पडल्यास संघात बदल होण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी शुभमन गिल याला संधी मिळू शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी गिलला सुरुवातीला संघात स्थान देण्यात आले नव्हते. मात्र, टी20 मालिका आणि विश्वचषकासाठी जवळपास तोच संघ कायम राहणार असल्याने तिलक पूर्णपणे फिट न झाल्यास गिलची पुनरागमनाची दारे उघडू शकतात.

तथापि, शुभमन गिलचा अलीकडील टी20 कामगिरीचा आलेख फारसा प्रभावी राहिलेला नाही, ही बाबही निवड समितीच्या लक्षात आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते खेळाडूंची सध्याची फिटनेस स्थिती आणि फॉर्म या दोन्ही बाबींचा सखोल विचार करतील. भारतीय संघासाठी हा काळ निर्णायक असून, तिलक वर्माच्या दुखापतीमुळे संघाच्या संयोजनावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Sandeep Deshpande : नाराजीच्या बातम्यांना पूर्णविराम! संतोष धुरींच्या विधानावर संदीप देशपांडे यांच स्पष्टीकरण काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number