Smartphone Tips: आजच्या काळात स्मार्टफोन हा फक्त कम्युनिकेशनसाठीचा डिव्हाईस नाही, तर संपूर्ण लाइफस्टाईल त्याच्यावर अवलंबून आहे. ऑफिस वर्क,ऑनलाईन पेमेंट , समाज माध्यमे, फोटोग्राफी, बँकिंग सर्व काही आपण फोनवर करतो. पण हे सगळं करताना अनेकजण नकळत काही अशा चुकीच्या सवयी लावत जातात ज्या फोनच्या हेल्थवर थेट घाला घालतात. फोन बाहेरून दिसायला नवीन असला तरी आतून त्याची बॅटरी व परफॉर्मन्स रोजच कमजोर होत जातो. परिणाम असा की काही महिन्यांतच फोन स्लो होऊ लागतो, बॅटरी जास्त गरम होऊ लागते आणि काही वेळा डिव्हाईस डॅमेज होण्यापर्यंत परिस्थिती जाते.
पहिली, आणि सर्वात जास्त पाहिली जाणारी सवय म्हणजे रात्री झोपताना फोन चार्ज लावून ठेवणे. बरेच लोकांना वाटतं की सकाळी उठल्यावर 100 टक्के चार्ज मिळेल म्हणून फोन रातभर चार्जला ठेवणे फायदेशीर आहे. पण हेच सर्वात मोठं नुकसान आहे. फोन 100 टक्के चार्ज झाल्यानंतरही तो चार्जिंगवर जोडलेला राहिल्यामुळे सेल केमिस्टरी वर दबाव तयार होतो. बॅटरी ओव्हरहीट होऊ लागते आणि तिची क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते. अनेक रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे की अशा ओव्हरचार्जिंगमुळे बॅटरी फुगणे किंवा बॅटरी डॅमेज होणे सुद्धा शक्य आहे. त्यामुळे फोन 100 टक्के झाल्यावर एकदाही प्लग काढणे हा सोपा पण महत्वाचा नियम पाळला पाहिजे.
दुसरी सवय अशी की बॅटरी पूर्ण 0 टक्के पर्यंत वापरणे. काही जणांना वाटतं की फोन पूर्णपणे डिस्चार्ज होऊ दे, मग चार्ज करावा. पण हा नियम आता modern Lithium-ion batteries वर लागूच नाही. या बॅटरींसाठी आयडियल रेंज म्हणजे 20 टक्के ते 80 टक्के . तज्ञ् सांगतात की जर फोन नेहमी या मर्यादेत चार्ज-डिसचार्ज झाला तर त्याची health जास्त काळ टिकते. झिरो टक्क्यापर्यंत वापर केला तर बॅटरीवर दबाव येतो आणि सेल्स कायमचे खराब होण्याची शक्यता वाढते.
हेही वाचा: RBI Junio Payments: आता बँक खात्याशिवाय चालणार UPI! लहान मुलंही करू शकणार ऑनलाइन पेमेंट
तिसरी सवय म्हणजे लोकल चिप चार्जर किंवा डुप्लिकेट केबल वापरणे. आजकाल बहुतेक लोक ऑनलाईन वरून वेगवेगळे फास्ट चार्जर्स घेतात पण त्यांचा व्होल्टेज , क्वालिटी आणि रेटिंग मूळ कंपनीने दिलेल्याप्रमाणे नसतो. अशा चार्जर्स मध्ये सुरक्षा चिप्स नसतात. त्यामुळे केवळ बॅटरीच नाही तर फोनचा मदरबोर्ड , चार्जिंग IC, पोर्ट सगळ्यांना धोका वाढतो. ब्रँडेड फोनसाठी मूळचे सर्टिफाईड चार्जर्स का वापरायला सांगतात त्याच कारण हेच आहे.
या तीन छोट्या वाटणाऱ्या , पण मोठा धोका आणणाऱ्या सवयी फोनचं आयुष्य काही महिन्यांत संपवू शकतात. फोन हे आजच्या काळातली मोठी गरज आहे. त्यामुळे त्याच्यासोबत स्मार्ट उपकरण ही तितकीच आवश्यक गोष्ट आहे. रात्री चार्ज लावून ठेवणे टाळणे, बॅटरी 20 टक्के 80 टक्के रेंज मध्ये मेंटेन करणे आणि नेहमी सर्टिफाईड चार्जर वापरणे हे बेसिक रूल्स पाळले तरच फोन दीर्घकाळ नीट राहतो.