युक्रेन युरोपियन महासंघाचा सदस्य बनण्यासाठी आग्रह असून युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की यांनी सोमवारी युरोपियन संघाचा सदस्य होण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यानंतर आता युरोपियन महासंघाने युक्रेनचा सदस्यत्वाचा अर्ज स्विकारला आहे.
युरोपियन सदस्यत्वानुसार, युरोपियन संघाचे देश संरक्षण नियमाने बांधील असल्यामुळे एखाद्या देशाने कोणत्याही युरोपियन संघातील सदस्य देशावर हल्ला केल्यास इतर सदस्य देशांनी त्याला मदत करावी. त्यामुळे आता युरोपियन महासंघाचा सदस्य झाल्यामुळे युक्रेनच्या सैन्याला लष्करी हल्ल्यासाठी मदत होणार आहे. तसेच युरोपियन संघामध्ये सामील झाल्यामुळे युक्रेनला आर्थिक फायदा होण्यासही मदत होणार आहे.