नोएडा : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना रद्द करण्यात आला. एकही चेंडू टाकण्यात आला नाही, यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. मुसळधार पाऊस आणि ओले मैदान यामुळे खेळ झाला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चेंडू टाकल्याशिवाय कसोटी सामना रद्द होण्याची ही आठवी वेळ आहे. एकविसाव्या शतकात असे पहिल्यांदाच घडले आहे. कसोटी क्रिकेटच्या ९१ वर्षांच्या इतिहासात एकही चेंडू टाकल्याशिवाय कसोटी रद्द होण्याची ही आशियातील पहिली वेळ आहे. याआधी रद्द झालेले सात कसोटी सामने आशिया खंडाबाहेर होते.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २५४९ कसोटींपैकी आठ सामने एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आले आहेत. न्यूझीलंड संघाची १९९८ मध्ये भारताविरुद्धची ड्युनेडिन कसोटीही पावसामुळे रद्द झाली होती.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील रद्द झालेले आठ सामने