विधान परिषदेत जागा दहा, उमेदवार बारा?

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षांकडून उमदेवारी जाहीर झाली आहे. येत्या २० जून रोजी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत जागा दहा आणि उमदेवार बारा रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता विधानसभेची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत […]

विधान परिषदेत जागा दहा, उमेदवार बारा?

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षांकडून उमदेवारी जाहीर झाली आहे. येत्या २० जून रोजी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत जागा दहा आणि उमदेवार बारा रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता विधानसभेची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय उमा खापरे, यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रयतक्रांती मोर्चाचे नेते सदाभाऊ खोत अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भाजपाचा पाठिंबा असलेले खोत हे अपक्ष उमेदवार म्हणून विधानपरिषद निवडणुक लढवणार आहेत.

शिवसेनेकडून सचिन अहिर, आणि आमश्या पडवी यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी संधी देण्यात आली असून दोन्ही नेत्यांनी उमदेवारी अर्ज दाखल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाचे कमळ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घालणारे एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे खडसेंचे पुनर्वसन होणार आहे.

तसेच, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून भाई जगताप यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता काँग्रसेकडून नेत्यांना उमदेवारी देण्यात आली आहे.

पंकजा मुंडे यांचा पत्ता कट

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच नावे जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या उमदेवारीमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपाच्या पहिल्या पाच उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचं नाव नसल्यामुळे मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. तसेच शिवसेना खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही भाजपवर टीका केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number