ICC T20 World Cup 2026: शुभमन गिल बाहेर, इशान किशनची धडाकेबाज एन्ट्री! टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्कॉड जाहीर

टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी बीसीसीआयने टीम इंडियाचा 15 सदस्यीय स्कॉड जाहीर केला आहे.

ICC T20 World Cup 2026: शुभमन गिल बाहेर, इशान किशनची धडाकेबाज एन्ट्री! टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्कॉड जाहीर

ICC T20 World Cup 2026: आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अखेर टीम इंडियाचा बहुप्रतिक्षित स्कॉड जाहीर केला आहे. चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड बैठकीनंतर 15 खेळाडूंची अंतिम यादी समोर आली असून या स्कॉडमध्ये अनेक धक्कादायक आणि चर्चेतील निर्णय पाहायला मिळाले आहेत.

या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता. आता त्या यशानंतर नव्या कर्णधारासह आणि नव्या रणनीतींसह भारत पुन्हा एकदा जागतिक विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

या स्कॉडमधील सर्वात मोठा धक्का म्हणजे शुभमन गिलला संघात स्थान न मिळणे. सातत्यपूर्ण कामगिरी असूनही त्याची निवड न झाल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याउलट, इशान किशनची अनपेक्षित एन्ट्री लक्षवेधी ठरली आहे. यामुळे विकेटकीपरच्या भूमिकेत स्पर्धा वाढणार असल्याचं चित्र आहे.

हेही वाचा: Hardik Pandya: हार्दिक पांड्याची दमदार खेळी; अवघ्या 16 चेंडूत 50 धावा पूर्ण, इतक्या कमी चेंडूत अर्धशतक करणारा दुसरा भारतीय

फलंदाजी विभागात अभिषेक शर्मा आक्रमक सुरुवात देण्याची जबाबदारी सांभाळेल, अशी अपेक्षा आहे. त्याच्यासोबत संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यावर मधल्या फळीत डाव सावरण्याची जबाबदारी असेल. शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे फिनिशरची भूमिका पार पाडतील.

गोलंदाजी विभागात अनुभवी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग भारताचे प्रमुख शस्त्र असतील. वेगवान गोलंदाजांसोबतच फिरकी आघाडीवर कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती महत्त्वाची भूमिका बजावतील. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे अष्टपैलू खेळाडू संघाला संतुलन देतील.

हेही वाचा: IND vs SA: भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच; टी-20 विश्वचषकानंतर सलग सातव्यांदा जिंकली मालिका

टी-20 वर्ल्ड कप 2026 भारतातच होणार असून भारताचा समावेश गट-ए मध्ये करण्यात आला आहे. या गटात भारतासोबत पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स यांचा समावेश आहे. भारत-पाकिस्तान सामना हा स्पर्धेतील सर्वात चर्चेचा लढत ठरणार आहे.

टीम इंडियाची वर्ल्ड कप मोहीम 7 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध सुरू होणार आहे. त्यानंतर दिल्ली, कोलंबो आणि अहमदाबाद येथे भारताचे साखळी सामने पार पडतील. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेत टीम इंडिया पुन्हा एकदा ट्रॉफी उंचावेल का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number