भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या दोन मॅचच्या टेस्ट सिरीजचा सामना 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा झाली असून यावेळी 15 खेळाडूंच्या नावांची यादी समोर आली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन या दोन्ही खेळाडूंचं कमबॅक झालं असून गुरनूर ब्रार याला देखील संधी देण्यात आली आहे. तसेच या सामन्यात टीम इंडियाच्या संघामध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळाला. एका नवख्या चेहऱ्याला यावेळेस टीम इंडियामधून खेळण्याची संधी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
मध्य प्रदेशच्या इंदौरचा असलेला हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून सारांश जैन आहे. विशेष म्हणजे या 33 वर्षीय खेळाडूने अद्याप एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. सारांश जैन हा उजव्या हाताचा ऑफ-स्पिनर आणि डावखुरा फलंदाज असून क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे बीसीसीआयने संघाची घोषणा केल्यानंतर एका खेळाडूची विशेष चर्चा रंगत आहे मध्य प्रदेशचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू सारांश जैनचा संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. दरम्यान या कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
33 वर्षांचा सारांश जैन कोण आहे?
टीम इंडियात 33 व्या वयात एन्ट्री करणारा सारांश जैन हा मध्य प्रदेशचा स्पिनर बॉलर आहे. या ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडूने 85 डावांमध्ये 31.75 च्या सरासरीने 2223 धावा केल्या आहेत. अलीकडेच त्याने भारत 'अ' संघाकडून श्रीलंका 'अ' संघाविरुद्ध खेळताना दोन सामन्यांत सहा बळी घेतले आणि नाबाद 70 धावा करून प्रभावी कामगिरी केली होती. ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखालील इंडिया 'ए' संघाने दुसरी अनधिकृत कसोटी 10 गडी राखून जिंकली आणि मालिका 1-0 अशी आपल्या नावे केली होती. सारांश जैनचे वडील, सुबोध जैन, हे मध्य प्रदेशचे माजी रणजी खेळाडू होते. दरम्यान सारांशने अद्याप एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. तरी देखील भारत 'अ' संघाकडून श्रीलंका 'अ' संघाविरुद्ध त्याची तुफान खेळी पाहून सारांश जैनला वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर टीम इंडियात एन्ट्री मिळाली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीसाठी भारताचा संघ
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनुरु ब्रार, देवदत्त पडिकल, सारांश जैन