T20 World Cup 2026: एकीकडे बहिष्कारची भाषा, दुसरीकडे विश्वचषकासाठी संघ जाहीर; टी-20 विश्वचषकाआधी पाकिस्तानचा मोठा डाव

टी-20 विश्वचषक 2026 मधून बांगलादेश संघाची हकालपट्टी केल्यानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.

T20 World Cup 2026: एकीकडे बहिष्कारची भाषा, दुसरीकडे विश्वचषकासाठी संघ जाहीर; टी-20 विश्वचषकाआधी पाकिस्तानचा मोठा डाव

टी-20 विश्वचषक 2026 मधून बांगलादेश संघाची हकालपट्टी केल्यानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेचे कारण देत नकार दिला होता. बांगलादेशने आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने फेटाळून लावली. त्यानंतर शनिवारी 24 जानेवारी रोजी आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाद करून त्यांच्या जागी स्कॉटलँड संघाचा समावेश केला. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

हेही वाचा- Gautam Gambhir: 'त्याचा स्वभाव अनेकांना…'; गौतम गंभीरला सोशल मीडियापासून लांब राहण्याचा सल्ला, नेमकं प्रकरण काय?

7 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकापुर्वी बांगलादेश आणि पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारीला सामना होणार आहे. बांगलादेशला स्पर्धेतून वगळ्यात आल्यामुळे भारत विरुद्ध या सामन्यावर बहिष्कार टाकत पाकिस्तानने देखील टी-20 विश्वचषकातून माघार घेण्याची धमकी दिली. एकीकडे भारतविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाने आपला संघही जाहीर केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी 15 खेळाडूंच्या संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या संघाचं नेतृत्व सलमान अली आघा करणार आहे. तसेच आयसीसी बांगलादेशला दुसरी संधी देऊ शकते. ज्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. 

टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानचे वेळापत्रक
7 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स

10 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध अमेरिका

15 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत

18 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध नामिबिया

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number