साखरेच्या निर्यातीवर १ जूनपासून बंदी

वाढत्या महागाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेलानंतर आता साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झालं आहे. त्यामुळे देशांतर्गत साखरेचे दर वाढत होते. त्यामुळे वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे साखर स्वस्त […]

साखरेच्या निर्यातीवर १ जूनपासून बंदी

वाढत्या महागाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेलानंतर आता साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झालं आहे. त्यामुळे देशांतर्गत साखरेचे दर वाढत होते. त्यामुळे वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे साखर स्वस्त होणार आहे. मात्र या निर्णयामुळे साखर कारखान्यांचे अर्थकारण बिघडण्याचीही शक्यता आहे.

१०० टन साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. वाढती महागाई आणि खाद्य तेलाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुर्वी देशांत गव्हाचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. कच्च्या आणि पांढऱ्या साखरेच्या निर्यातीवर १ जून पर्यंत निर्यात घालण्यात आली आहे. मात्र सीएक्सएल आणि टीआरक्यूनिसार देशात एक निश्चित प्रमाणात साखरेची निर्यात केली जाणार आहे, माहिती परराष्ट्र व्यापार महासंचनालयाने दिली आहे.

दरम्यान देशात सध्या ९० लाखांहून अधिक निर्यात होत आहे. ब्राझीलनंतर भारत साखरेचा निर्यातदार ठरला आहे. भारताने चालू मार्केटिंक वर्षात ८५ लाख टन साखरेच्या निर्यातीचा निर्णय घेतला होता.  गेल्या वर्षी ७१. ९१ लाख साखरेची निर्यात भारतातून करण्यात आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number