India vs New Zealand : गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या T-20 विश्वचषक 2026 च्या अत्यंत चुरशीच्या 2 ऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 धावांनी थरारक विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 253/7 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ झुंजार खेळी करूनही लक्ष्यापासून काही पावले दूर राहिला. या विजयासोबतच भारताने आता विश्वविजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी अंतिम फेरीत न्यूझीलंडशी लढत निश्चित केली आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड असा असून 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान क्रीडा प्रेमींना ही विशेष मॅच पाहता यावी यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.
हेही वाचा- IND vs NZ Ahmedabad Narendra Modi Stadium : 2023 च्या वर्ल्ड कपची आठवण पुन्हा जागी! ‘मोदी स्टेडियम’वरील अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय
यावेळी गाडी क्रमांक 09027 अतिजलद तेजस एक्सप्रेस मुंबई सेंट्रल वरून आज रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी सुटणार आहे. गाडी क्रमांक 0928 तेजस एक्स्प्रेस 9 मार्च रोजी रात्री 3 वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि मुंबई सेंट्रल येथे सकाळी 11.15 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 09021 वातानुकूलित अतिजलद एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल येथून 8 मार्च रोजी सकाळी 6.20 वाजता सुटेल आणि दुपारी 12.40 वाजता अहमदाबादला पोहोचेल. या गाड्यांना बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा येथे थांबा देण्यात येईल.