कर्ज घेणे सोपे असले तरी ते परतफेड करणे हे अनेकांसाठी मोठं आव्हान ठरते. चुकीच्या नियोजनामुळे व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकतो आणि मानसिक तणाव वाढतो. अलीकडेच मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीवर 1.40 कोटी रुपयांचे प्रचंड कर्ज होते. ते फेडणे अशक्य असल्याचे वाटल्याने त्याने गाडी नदीत ढकलून मृत्यूचे नाटक रचले. पण नंतर तो महाराष्ट्रात जिवंत सापडला. चौकशीत त्याने स्पष्ट केले की कर्जाच्या ओझ्यातून सुटका मिळवण्यासाठी हा बनाव केला.
या घटनेवरून दिसते की Personal Loan योग्य पद्धतीने हाताळले नाही तर परिस्थिती किती बिकट होऊ शकते. म्हणूनच कर्ज घेतल्यानंतर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील सहा टिप्स महत्त्वाच्या ठरतात –
1. EMI चे प्रमाण नियंत्रित ठेवा
मासिक उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त रक्कम हप्त्यांवर खर्च होऊ नये. जर मासिक उत्पन्न 20,000 रुपये असेल, तर EMI 10,000 रुपयांपेक्षा जास्त नसावा.
2. Refinancing चा पर्याय वापरा
हप्ते भरायला मोठे जात असल्यास कर्जाचा कालावधी वाढवून EMI कमी करता येतो.
3. कमी व्याजदरात कर्ज ट्रान्सफर करा
कमी व्याजदर असलेल्या बँक किंवा NBFC कडे कर्ज ट्रान्सफर केल्यास दीर्घकालीन बचत होते.
4. बँकांशी संवाद साधा
अडचणीत असाल तर बँकेशी लगेच संपर्क करा. EMI restructure किंवा मोरॅटोरियम मिळू शकते.हा पर्याय महत्वाचा आहे.
5. योग्य कर्ज व संस्था निवडा
कर्ज घेण्यापूर्वी तुलना करा. बँकांचे व्याजदर NBFC पेक्षा कमी असतात. Personal Loan ऐवजी शक्य असल्यास Business Loan स्वस्त पडतो.
6. अनावश्यक खर्च कमी करा
जादाचा खर्च कमी करून जादा EMI भरल्यास कर्ज लवकर संपवता येते.
या टिप्स अमलात आणल्यास Personal Loan चा भार हलका होतो, आर्थिक स्थिरता टिकते आणि मानसिक तणाव कमी होतो. योग्य नियोजन हेच कर्ज व्यवस्थापनाचे खरे सूत्र आहे.