Shiv Thakare: मराठमोळा शिव ठाकरे ठरला ‘द 50’चा पहिला विजेता; 50 लाख रुपयांचं बक्षीस दिलं चाहत्याला

द 50 रिअॅलिटी शोचा पहिला विजेता म्हणून शिव ठाकरेने बाजी मारली 50 लाखांची रक्कम स्वतःकडे न ठेवता चाहत्याला दिल्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे,

Shiv Thakare: मराठमोळा शिव ठाकरे ठरला ‘द 50’चा पहिला विजेता; 50 लाख रुपयांचं बक्षीस दिलं चाहत्याला

The 50 reality show: मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेल्या ‘द 50’ या रिॲलिटी शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आणि या शोला त्याचा पहिला विजेता मिळाला. महाराष्ट्राचा अभिमान ठरलेला शिव ठाकरेने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं. विशेष म्हणजे, जिंकलेली 50 लाख रुपयांची रक्कम त्याने स्वतःकडे न ठेवता एका चाहत्याला देण्याचा निर्णय घेतल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

‘द 50’ हा शो सुरुवातीपासूनच वेगळ्या संकल्पनेमुळे चर्चेत होता. विविध क्षेत्रातील 50 स्पर्धकांनी या शोमध्ये भाग घेतला होता. टेलिव्हिजन कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, क्रीडापटू आणि इतर सेलिब्रिटी अशा विविध पार्श्वभूमीतील स्पर्धकांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. अंतिम फेरीत काही तगडे स्पर्धक होते, मात्र शिव ठाकरेने आपल्या शांत आणि समंजस खेळाच्या जोरावर सर्वांना मागे टाकलं.

हेही वाचा: Shraddha Kapoor Marriage : श्रद्धा कपूर अडकणार लग्नबंधनात? राहुल मोदीसोबतच्या नात्यावर मावशी म्हणाली, 'खरंच…'

शिव ठाकरेने या आधीही अनेक रिॲलिटी शोमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची साधी राहणी, प्रामाणिक स्वभाव आणि प्रेक्षकांशी असलेला जिव्हाळा यामुळे त्याला मोठा चाहतावर्ग लाभला आहे. ‘द 50’मध्येही त्याने कोणत्याही वादापासून दूर राहून संयमाने खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना शिव ठाकरेने सांगितले की, हा शो त्याच्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. या मंचावरून त्याला स्वतःचा एक सकारात्मक पैलू लोकांसमोर मांडता आला. केवळ आक्रमक खेळ किंवा वाद घालून नव्हे, तर शांततेने आणि योग्य रणनीतीनेही यश मिळू शकतं, हे दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला.

सर्वात विशेष म्हणजे, त्याने मिळालेली बक्षिसाची रक्कम आपल्या एका चाहत्याला देण्याचा निर्णय घेतला. “हा विजय माझ्यासोबत माझ्या चाहत्यांचाही आहे,” असं तो म्हणाला. त्याच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर त्याचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. अनेकांनी त्याच्या उदार वृत्तीचं आणि चाहत्यांप्रती असलेल्या प्रेमाचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा: Jai Jai Swami Samarth Serial: ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत मोठा ट्विस्ट! अक्षय मुदवाडकरच्या जागी नवा अभिनेता साकारणार स्वामींची भूमिका

या शोमध्ये अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले होते, त्यामुळे सुरुवातीपासूनच या स्पर्धेची रंगत वाढली होती. विविध टास्क, आव्हानं आणि गटबाजी यामधून पुढे जात शिव ठाकरेने अखेर विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.

‘द 50’च्या पहिल्या हंगामाचा शेवट हा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक ठरला. शिव ठाकरेचा हा विजय केवळ त्याच्यासाठीच नव्हे, तर त्याच्या चाहत्यांसाठीही खास ठरला आहे. आता पुढील हंगामात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number