सोमय्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक

सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली. त्यानंतर राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावार ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी राज्यात शिवसैनिक आंदोलन करणार असल्याचा इशारही राऊतांनी दिला होता. दरम्यान, आज किरीट सोमय्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन […]

सोमय्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक

सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली. त्यानंतर राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावार ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी राज्यात शिवसैनिक आंदोलन करणार असल्याचा इशारही राऊतांनी दिला होता. दरम्यान, आज किरीट सोमय्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.

ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणीसह राज्यातील अनेक भागांमध्ये शिवसेने किरीट सोमय्यांविरोधात आंदोलन केले. नाशिक येथे शिवसेना भवनासमोर शिवसैनिक आक्रमक  झाल्याचे पाहायला मिळाले. तर औरंगाबादमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांती चौक पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. परभणीत शिवसैनिकांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनीक जमा झाले होते. किरीट सोमय्या हे देशद्रोही असून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच उल्हासनगरमध्ये शिवसेनेने कल्याण-बदलापूर महामार्ग रोखून धरत किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केले.

नाशिकमध्ये भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

नाशिकमध्ये शिवसेनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या  पाश्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आज भाजपच्या एनडी पटेल रोड येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी हा बंदोबस्त लावला. या आधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या  कार्यालयावर हल्ला चढवत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. शिवसेना कार्यालयापासून अगदी काही अंतरावरच भाजप कार्यालय असल्याने नाशिक पोलिस तैनात करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number