मुंबई : वेस्ट इंडिज टीम 6 डिसेंबरपासून भारत दौऱ्यावर येत आहे. वेस्ट इंडिजच्या विरुद्धच्या मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया विंडीज विरुद्ध टी-20 आणि वनडे मालिका खेळणार आहे.
या मालिकेला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवर गब्बर शिखर धवनला दुखापत झाली आहे. त्यामुळे धवनने टी-20 मालिकेतून माघार घेतली आहे. शिखर धवनने माघार घेतल्याने टीम इंडियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
टीममध्ये शिखर धवनच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. संजू सॅमसनला बांगलादेशविरोधातील टी-20 मालिकेसाठी निवड झाली होती. परंतु त्याला अंतिम-11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
शिखर धवनला मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध खेळताना गुडघ्याला दुखापत झाली.
वेस्टइंडिज आणि टीम इंडिया यांच्यात 3 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळली जाणार आहे.
टी-20 सामने
पहिली टी-20 – 6 डिसेंबर 2019, हैदराबाद
दुसरी टी-20 – 8 डिसेंबर 2019, तिरुअनंतपुरम
तिसरी टी-20 – 11 डिसेंबर 2019, वानखेडे स्टेडिअम, मुंबई
एकदिवसीय सामने
पहिली वनडे – 15 डिसेंबर 2019, चेन्नई
दुसरी वनडे – 18 डिसेंबर 2019, विशाखापट्टणम
तिसरी वनडे – 22 डिसेंबर 2019, कटक
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), संजू सॅमसन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.