ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. नाशिकमध्ये सुरु असलेल्या साहित्य संमेलनस्थळी हा प्रकार घडला. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या अग्रलेखाबद्दल आक्षेप घेत शाईफेक करण्यात आली. शाईफेक केल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला […]

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. नाशिकमध्ये सुरु असलेल्या साहित्य संमेलनस्थळी हा प्रकार घडला. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या अग्रलेखाबद्दल आक्षेप घेत शाईफेक करण्यात आली. शाईफेक केल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून ते दोघेही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अशा प्रकारे शाईफेक करून भ्याड हल्ला करणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटू लागली आहे.

गिरीश कुबेरांवर शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघेही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहे. शाईफेक करून भ्याड हल्ला करणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटू लागली आहे. सतीश काळे आणि राजेश बुंदला अशी या दोघांची नावं असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नितीन रोटे पाटील यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number