आज रशिया-युक्रेन युद्धाचा १९वा दिवस आहे. तर गेल्या दोन आठवड्यांपासून रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. दरम्यान, रशियाने रविवारी पोलंड सीमेजवळ युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर क्रूझ क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात ३५ जणांचा झाला तर १३४ नागरिक जखमी झाले आहेत.
पोलंड ‘नाटो’चा सदस्य देश असून त्या देशाच्या सीमेलगतचा हा प्रशिक्षण तळ युक्रेनला पाश्चिमात्य मदत पुरवण्यासाठीचे प्रमुख केंद्र असल्याने रशियाने त्याला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
रशिया-युक्रेन या दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. सोमवारी १०.३० वाजता रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा होणार असल्याचे वृत्त युक्रेनेच्या शिष्टमंडळाच्या अधिकाऱ्याने दिले आहे.