रशिया-युक्रेन युद्धाने सोयाबीन तेलाच्या किंमतीत वाढ 

रशिया-युक्रेन युद्धाचा आज १९वा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, या युद्धाचा परिणाम आता थेट भारतातील सामान्य नागरिकांवर पडणार आहे. या युद्धामुळे सोयबीन तेलाच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे आता सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. भारत देश रशिया आणि युक्रेन या दोन देशांतून मोठ्या […]

रशिया-युक्रेन युद्धाने सोयाबीन तेलाच्या किंमतीत वाढ 

रशिया-युक्रेन युद्धाचा आज १९वा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, या युद्धाचा परिणाम आता थेट भारतातील सामान्य नागरिकांवर पडणार आहे. या युद्धामुळे सोयबीन तेलाच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे आता सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

भारत देश रशिया आणि युक्रेन या दोन देशांतून मोठ्या प्रमाणात सूर्यफूलाचे तेल आयात करतो. मात्र, या दोन्ही देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे या तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फायदा पामतेल उत्पादकांना होणार आहे.

रशिया-युक्रेन या दोन्ही देशांमधील युद्धामळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच हे युद्ध संपल्यानंतरही या स्थितीत लगेच सुधारणा होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांतील सूर्यफुलाच्या लागवडीवर दीर्घकाळ होणार असून उत्पादन कमी झाल्यास पुरवठा आणखी धोक्यात येणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number