रशिया-युक्रेनचा तणाव काही कमी होत नाही. युक्रेन- रशिया युद्धाचा परिणाम हा सर्वात जास्त रशिया आणि युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर झाला आहे. रशियातील भारतीय दूतावासाला विद्यार्थ्यांकडून रशियात राहण्याबाबत सल्ला मागणारे संदेश सतत प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक नियमावली जाहीर केली आहे.
भारतीय दूतावासाची विद्यार्थ्यांसाठी नियमावली
सुरक्षतेच्या कारणावरून विद्यार्थ्यांनी रशिया सोडू नये.
रशियातील भारतीय दूतावास नागरिकांच्या संपर्कात.
विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
रशियामध्ये बँकिंग सेवांमध्ये काही अडचणी.
विद्यार्थ्यांना भीती वाटत असेल तर त्यांनी भारतात यावे.
रशिया ते भारत थेट विमान विमान प्रवास उपलब्ध.
भारतीय दूतावास रशियन विद्यापीठाच्या संपर्कात.
सध्या सर्व शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेता येणार.
विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापीठांशी चर्चा करावी.