मुंबई : टीम इंडियाचा सिक्सर किंग रोहित शर्मा विक्रमापासून एक पाऊल दूर आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या सीरिजमध्ये रोहितला हा विक्रम करण्याची संधी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 सिक्सचा टप्पा पूर्ण करण्याची संधी हिटमॅन रोहित शर्माला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने 399 सिक्स लगावले आहेत.
विंडीज विरुद्ध एक सिक्स मारताच रोहितच्या नावे टीम इंडियाकडून सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड होणार आहे. यासोबतच रोहित 400 सिक्स मारणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरणार आहे.
तसेच टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावावर आहे. रोहितने टी-20 मध्ये सर्वाधिक 115 सिक्स मारले आहेत.
क्रिकेटच्या तीन्ही फॉर्मेटनुसार रोहितने मारलेले सिक्स
वनडे – 232
टी-20 – 115
टेस्ट – 52
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400 सिक्सचा टप्पा केवळ 2 खेळाडूंनीच ओलांडला आहे. विडींजच्या क्रिस गेल तर पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने ही कामगिरी केली आहे.
क्रिस गेलने एकूण 534 सिक्स ठोकले आहेत. तर शाहिद आफ्रिदीने 476 सिक्स मारलेत.
टीम इंडिया विंडीज विरुद्ध टी-20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध 3 टी-20 आणि 3 वनडे मॅच खेळणार आहे.
टी-20 सामने
पहिली टी-20 – 6 डिसेंबर 2019, वानखेडे स्टेडिअम, हैदराबाद
दुसरी टी-20 – 8 डिसेंबर 2019, तिरुअनंतपुरम
तिसरी टी-20 – 11 डिसेंबर 2019, मुंबई
एकदिवसीय सामने
पहिली वनडे – 15 डिसेंबर 2019, चेन्नई
दुसरी वनडे – 18 डिसेंबर 2019, विशाखापट्टणम
तिसरी वनडे – 22 डिसेंबर 2019, कटक
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.