Rohit sharma ODI Rankings : पुन्हा एकदा हिटमॅन ठरला वनडेचा बादशाह! न्यूझीलंडच्या खेळाडूकडून ‘तो’ किताब हिसकावत ठरला अव्वल

रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा सॅम अय्युबला मागे टाकत नंबर वन अष्टपैलू खेळाडू म्हणून आपलं नाव पुन्हा एकदा नोंदवल आहे.

Rohit sharma ODI Rankings : पुन्हा एकदा हिटमॅन ठरला वनडेचा बादशाह! न्यूझीलंडच्या खेळाडूकडून ‘तो’ किताब हिसकावत ठरला अव्वल

टीम इंडियाचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा याच्याबद्दल त्याच्या चाहत्यांना दोन आंनदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 2026 मध्ये होणाऱ्या टी20 क्रिकेट विश्वचषकासाठी रोहित शर्माची अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याच्यावर ही एक प्रतिष्ठेची जबाबदारी सोपवली आहे. असं असताना रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताज्या क्रमवारी जाहीर केल्या आहेत. यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा सॅम अय्युबला मागे टाकत नंबर वन अष्टपैलू खेळाडू म्हणून आपलं नाव पुन्हा एकदा नोंदवल आहे.
Rohit Sharma: हिटमॅनची नवी इनिंग! रोहित शर्मा टी20 वर्ल्ड कप 2026चा ब्रँड ॲम्बेसेडर

रोहित शर्माची बॅट फॉर्ममध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय संघाचा सलामवीर पुन्हा एकदा नंबर वन वनडे फलंदाज बनला आहे. यावेळी रोहित शर्मा 781 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर, डॅरिल मिशेल 766 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. आयसीसीने शेवटचे रँकिंग जाहीर केले तेव्हा डॅरिल मिशेल पहिल्या स्थानावर घसरला होता, परंतु आता रोहितने पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे. तर दुसरीकडे एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर असून विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. तर श्रेयस अय्यर 9 व्या क्रमांकावर आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 202 धावा केल्या होत्या. रोहितने स्वतःला तयार करण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या फिजिओथेरपिस्ट अमित दुबेची नियुक्ती केली आहे. रोहित शर्मा पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळेल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number