Rohit Sharma Post : "तु नेहमीच इतरांपेक्षा वेगळा…" रहाणेच्या निवृत्तीने हिटमॅन भावुक! मध्यरात्री पोस्ट करत जुन्या आठवणींना दिला उजाळा

भारतीय संघाचा अनुभवी अन् स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियातील हिटमॅन रोहित शर्मा भावूक झाला आहे.

Rohit Sharma Post : &quotतु नेहमीच इतरांपेक्षा वेगळा…&quot रहाणेच्या निवृत्तीने हिटमॅन भावुक! मध्यरात्री पोस्ट करत जुन्या आठवणींना दिला उजाळा

भारतीय संघाचा अनुभवी अन् स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली. यानंतर अजिंक्य रहाणेच्या पुढील वाटचालीसाठी टीम इंडियातील विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांच्याह अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर स्टोरी आणि पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या.

अशातच टीम इंडियातील हिटमॅन रोहित शर्मा अजिंक्य रहाणेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीने भावूक झाला आहे. मध्यरात्री 1 वाजता रोहित शर्माने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केली. यात त्याने अजिंक्य रहाणेला त्याच्या शानदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत दोघांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा- Ajinkya Rahane Retirement : "हीच ती योग्य वेळ…" अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; व्हिडीओ शेअर करत 12 वर्षांचा प्रवास संपवला

रोहित शर्मा यावेळी अजिंक्य रहाणेचा आणि त्याचा टेस्ट मॅचमधील फोटो देखील शेअर करत खास मेसेज लिहिला. रोहितने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "आपण अनेक वर्षे एकत्र ड्रेसिंग रूम शेअर केली आहे आणि तुला मिळालेल्या यशामागे किती कठोर परिश्रम आहेत, याची मला जाणीव आहे. तुझी निष्ठा आणि व्यावसायिकता यांनी तु नेहमीच इतरांपेक्षा वेगळा ठरवला आहेस. तुझ्या या शानदार कारकिर्दीबद्दल तुझे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!"

रहाणेचा भारतासाठी शेवटचा कसोटी सामना
जवळपास दोन दशकं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रहाणेने इन्स्टाग्रामवर एका भावूक व्हिडिओद्वारे आपल्या निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली. निवृत्तीबद्दल सांगताना अजिंक्य भावुक झालेला पाहायला मिळाला. अजिंक्यने रहाणेने भारतासाठी आपला शेवटचा कसोटी सामना 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचा शेवटचा सामना 2018 मध्ये, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता. रहाणेने आतापर्यंत 85 कसोटी सामने खेळले असून 144 डावांमध्ये 38.46 च्या सरासरीने 5,077 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 12 शतके आणि 26 अर्धशतके झळकावली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number