हिटमॅन रोहित शर्माचं ‘या’ यादीतील अव्वल स्थान कायम

विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम वनडेत रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. रोहितने 63 धावा केल्या. या अर्धशतकी खेळीसह रोहितने एका रेकॉर्डमधील यादीतील अव्वल स्थान कायम ठेवले आहे. रोहितने एका वर्षात सर्वात जास्त वेळा अर्धशतक किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतील आपले स्थान कायम ठेवले आहे. एक ओपनर म्हणून रोहितचं विंडिज विरुद्धचं अर्धशतकं हे या वर्षातील […]

हिटमॅन रोहित शर्माचं ‘या’ यादीतील अव्वल स्थान कायम

विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम वनडेत रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. रोहितने 63 धावा केल्या. या अर्धशतकी खेळीसह रोहितने एका रेकॉर्डमधील यादीतील अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

रोहितने एका वर्षात सर्वात जास्त वेळा अर्धशतक किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतील आपले स्थान कायम ठेवले आहे.

एक ओपनर म्हणून रोहितचं विंडिज विरुद्धचं अर्धशतकं हे या वर्षातील 20 वं अर्धशतक ठरलं आहे. क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटनुसार रोहितने गॅरी कस्टर्न यांना मागे टाकलं आहे.

रोहित शर्माने विंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली. तीन सामन्यांच्या मालिकेत रोहितने 258 धावा केल्या.

रोहितने पहिल्या वनडेत 36 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात 159 धावांची धमाकेदार खेळी केली. तर तिसऱ्या वनडेत 63 धावा केल्या.

दोन वर्षापूर्वी रोहितची विक्रमाची बरोबरी

रोहितने दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

रोहितने दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध टी-20 मध्ये 35 बॉलमध्ये शतकी कामगिरी केली होती.

श्रीलंकेच्या विरुद्ध 22 डिसेंबर 2017 ला हा टी-20 सामना इंदूरला खेळला गेला होता.

या सामन्यात रोहितने एकूण 118 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 10 सिक्स आणि 12 फोर लगावलेले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number