Rohit Sharma: रोहित शर्मा घेणार होता निवृत्ती? 2023 विश्वचषकानंतरच्या ‘त्या’ निर्णयावर रोहितचा मोठा खुलासा

क्रिकेट सोडण्याचा विचारही मनात आला होता, असा भावनिक खुलासा त्याने केला आहे. मात्र त्यानंतरच्या यशस्वी पुनरागमनाने रोहितने स्वतःला सिद्ध केले.

Rohit Sharma: रोहित शर्मा घेणार होता निवृत्ती? 2023 विश्वचषकानंतरच्या ‘त्या’ निर्णयावर रोहितचा मोठा खुलासा

हरियाणा: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मिळालेल्या पराभवाबाबत एक अत्यंत भावनिक खुलासा केला आहे. “अहमदाबादमधील त्या पराभवानंतर मी इतका खचलो होतो की, आता यापुढे क्रिकेट खेळायचं नाही, असा विचार माझ्या मनात आला होता,” असे भावनिक वक्तव्य रोहितने एका मुलाखतीत केले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगवल्यानंतरचा तो काळ वैयक्तिकरित्या त्याच्यासाठी प्रचंड कठीण होता.

रोहितच्या मते, 2022 मध्ये जेव्हा त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली, तेव्हापासून त्याचे एकमेव लक्ष मायदेशात होणाऱ्या विश्वचषकावर होते. त्याने या स्पर्धेत 11 सामन्यांत 54.27 च्या सरासरीने 597 धावा करत स्वतःला झोकून दिले होते. मात्र, अंतिम फेरीत भारतीय संघ केवळ 240 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

हेही वाचा: PM Modi on Maharashtra Election: ‘महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे…’; महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

रोहित म्हणाला की, “त्या पराभवानंतर माझ्या शरीरात आणि डोक्यात कसलीच ऊर्जा उरली नव्हती. खेळानं माझं सर्वस्व हिरावून घेतलंय असं मला वाटत होतं. त्या धक्क्यातून सावरून पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला दोन महिने लागले.”

मात्र, खेळाप्रती असलेलं प्रेम आणि जिद्दीच्या जोरावर रोहितने पुन्हा मैदानावर पुनरागमन केले. ज्या खेळामुळे तो निराश झाला होता, त्याच खेळाने त्याला नंतर ऐतिहासिक यश दिले. रोहितच्याच नेतृत्वाखाली भारताने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर मार्च 2025 मध्ये चॅम्पियंस ट्रॉफीवरही आपले नाव कोरले.

टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला रोहित आता केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असून, एका पराभवामुळे करिअर संपवण्याचा विचार करणारा हा खेळाडू आज जगातील यशस्वी कर्णधारांपैकी एक ठरला आहे.

हेही वाचा: Lonavla Nagarparishad Election : लोकशाहीचं जिवंत उदाहरण! पेरू विकणारी थेट नगरसेवकपदी विराजमान, जाणून घ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number