रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडूंना गेल्या वर्षी बीसीसीआयकडून काही कठोर निर्णयांचा सामना करावा लागला होता. नेतृत्व बदल, संघरचनेतील फेरबदल आणि निवड धोरणांमुळे दोघांनाही मोठे धक्के बसले. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बीसीसीआय आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. या संभाव्य निर्णयामुळे रोहित आणि विराट यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता आणि चिंता दोन्ही वाढल्या आहेत.
ICC Player Ranking : टीम इंडियाचा तिन्ही फॉरमॅटमध्ये दरारा; जसप्रीत बुमराह आणि जडेजाने गाजवलं मैदान
इंग्लंडविरुद्धची मालिका काही दिवसांवर असताना बीसीसीआय अजून एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नव्या मोसमासाठीचे करारबद्ध खेळाडू निश्चित करण्याच्या दृष्टीने कोणाला बढती आणि कोणाची पीछेहाट याचा विचार केला आहे. यावेळी विराट आणि रोहितचा ‘अ’ प्लस गटात समावेश असला तरी कसोटी, टी-20 आणि वन-डे प्रकारासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंना स्थान दिले जाते. मात्र बीसीसीआयने गेल्यावर्षी रोहित शर्माकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून घेतले.
एवढचं नव्हे तर विराट कोहली आणि रोहित शर्माला कसोटी संघाबाहेर केले. रोहितच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही बीसीसीआयने वनडे कॅप्टन्सीवरून काढून टाकले. मात्र, आता सर्व प्रकारात खेळत नसल्यामुळे त्यांना ‘अ’ गटात स्थान देण्याचा विचार होत आहे. आता विराट तसेच रोहित खालच्या गटात येण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माला कराराद्वारे देण्यात येणारी रक्कम कमी होण्याची शक्यता आहे.