मुंबई, १३ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही क्रिकेटर ऋषभ पंतसोबत प्रेमपर्णाच्या चर्चांमुळे सतत चर्चेत असते. ते दोघे प्रेमसंबंधात आहेत अशा चर्चा होत्या त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमकीही झाल्या. दरम्यान आय पी एल च्या सामन्यादरम्यान ऋषभच्या चाहत्यांनी तिच्या नावाच्या घोषणा दिल्या. यामुळे तिने ऋषभ च्या चाहत्यांची चांगलीच शाळा घेतली.
डीसी विरुद्ध एसआरएच या आयपीएल सामन्यादरम्यान एक चाहता ऋषभ पंतचा जयजयकार करत होता. यादरम्यान तो उर्वशी रौतेलाचे नाव घेऊन चुकीच्या पद्धतीने आरडाओरड करू लागला. ह्या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ क्षणार्धात समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. आता हा व्हिडिओ उर्वशीच्या नजरेत आल्यानंतर तिचा राग अनावर झाला आणि तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ सामायिक करत त्याची चांगलीच शाळा घेतली.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती , ‘उर्वशी रोतुला आम्ही सोडणार नाही. भाऊ माझ्याकडे बघ मी विष घेईन.’ असं म्हणताना दिसत आहे.
यावर उर्वशीने, ‘अशा चुकीच्या पद्धतीने माझ्या नावाचा जयजयकार करणे बंद करा. माझे आडनाव माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या शब्दाला विशेष अर्थ आणि सामर्थ्य आहे. मला माझं चुकीचं आडनावं घेणं अजिबात आवडत नाही.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.