Praful Hinge Followers: प्रफुल्ल हिंगेचा डबल धमाका! मैदानावर विक्रम, तर सोशल मीडियावर सहा हजारांवरून थेट 3 लाख फॉलोअर्स

आयपीएल 2026 मध्ये प्रफुल्ल हिंगेने पदार्पणातच विक्रम करत सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला असून काही तासांतच त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये लाखोंची वाढ झाली आहे.

Praful Hinge Followers: प्रफुल्ल हिंगेचा डबल धमाका! मैदानावर विक्रम, तर सोशल मीडियावर सहा हजारांवरून थेट 3 लाख फॉलोअर्स

Praful Hinge Followers: आयपीएल 2026 मध्ये सनराइजर्स हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या Praful Hinge याने केवळ मैदानावरच नव्हे, तर सोशल मीडियावरही अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरी करत त्याने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले, तर काही तासांतच त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात हिंगेने गोलंदाजी करताना पहिल्याच षटकात तीन फलंदाजांना बाद करत इतिहास रचला. त्याने वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लहुआन-ड्रे प्रेटोरियस यांना सलग बाद करत प्रतिस्पर्धी संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का दिला. यानंतर त्याने पुन्हा गोलंदाजीत कमाल करत एकूण चार विकेट्स घेत सामन्यात आपली छाप पाडली.

या कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. सामन्याच्या सुरुवातीला त्याचे फॉलोअर्स केवळ काही हजारांमध्ये होते, मात्र काही तासांतच हा आकडा लाखोंमध्ये पोहोचला. एका व्हिडिओमध्ये त्याच्या फॉलोअर्सची संख्या सतत वाढताना दिसत असून, प्रत्येक रिफ्रेशनंतर हजारोंनी फॉलोअर्स वाढत असल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आता पर्यंत प्रफुल हिंगेची अनेक फेक अकाउंट तयार करण्यात आली आहेत. 

आयपीएल हे तरुण खेळाडूंना मोठं व्यासपीठ देतं, याचं आणखी एक उदाहरण म्हणजे प्रफुल्ल हिंगे. एका उत्कृष्ट कामगिरीमुळे तो एका रात्रीत चर्चेचा विषय बनला आहे. नेटिझन्सनीही यावर विविध प्रतिक्रिया देत “एका ओव्हरने आयुष्य बदललं” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

नागपूरचा रहिवासी असलेला हा 24 वर्षीय वेगवान गोलंदाज विदर्भकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने 2024 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि रणजी ट्रॉफीत सातत्यपूर्ण कामगिरी करत स्वतःची ओळख निर्माण केली. तसेच सैयद मुश्ताक अली स्पर्धेतही त्याने मर्यादित संधी मिळूनही प्रभावी गोलंदाजी केली होती.

आयपीएलपूर्वी त्याचा टी-20 अनुभव कमी असला, तरी त्याच्या मेहनतीचा आणि आत्मविश्वासाचा प्रत्यय या सामन्यात आला. “मी आधीपासूनच अशी कामगिरी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं,” असे त्याने सामन्यानंतर सांगितले.

एकंदरीत, प्रफुल्ल हिंगेची ही दमदार एंट्री आणि सोशल मीडियावरील लोकप्रियता यामुळे तो आता आयपीएलमधील नवा स्टार ठरला आहे. आगामी सामन्यांमध्ये तो आणखी काय कमाल करतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number