Petrol-Diesel Rate Today: इराण-अमेरिका युद्ध संपलं; कच्च्या तेलाचे दर घसरल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा उलटफेर

WTI क्रूडच्या किमतींमध्ये सुमारे 4 ते 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जागतिक पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Petrol-Diesel Rate Today: इराण-अमेरिका युद्ध संपलं; कच्च्या तेलाचे दर घसरल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा उलटफेर

अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या करारानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात मोठी घसरण झाली असून आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे आधीच तेल पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मात्र शांतता कराराची घोषणा होताच ब्रेंट क्रूड आणि WTI क्रूडच्या किमतींमध्ये सुमारे 4 ते 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जागतिक पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीमागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. मध्यपूर्वेत तेल पुरवठ्याशी संबंधित असलेला धोका कमी झाल्यामुळे बाजारातील भीती निवळली आहे. त्याचबरोबर होर्मुझ सामुद्रधुनीसारखे महत्त्वाचे तेल वाहतूक मार्ग पुन्हा खुले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणवरील आर्थिक निर्बंध शिथिल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून त्यामुळेही पुरवठा वाढण्याचा अंदाज आहे. या सर्व घटकांमुळे जागतिक तेल पुरवठ्यात स्थिरता येईल अशी शक्यता निर्माण झाली असून परिणामी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली आहे.

काय आहेत भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर? 
नवी दिल्ली: पेट्रोल 102.12 रुपये प्रति लीटर, डिझेल 95.20 रुपये  प्रति लीटर
जयपूर: पेट्रोल 112.66 रुपये , डिझेल 97.78 रुपये  प्रति लीटर
पटणा: पेट्रोल 112.70 रुपये , डिझेल 99.87 रुपये प्रति लीटर
लखनऊ: पेट्रोल 102.05 रुपये , डिझेल 99.28 रुपये प्रति लीटर
अयोध्या: पेट्रोल 102.05 रुपये , डिझेल 99.28 रुपये  प्रति लीटर
इंदौर: पेट्रोल 114.61रुपये , डिझेल 99.70 रुपये  प्रति लीटर
भोपाळ: पेट्रोल 114.65 रुपये, डिझेल 99.74 रुपये  प्रति लीटर

तेल कंपन्यांकडे आधीच्या खर्चाचा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याने दरात तात्काळ मोठा बदल दिसणार नाही. पण जर कच्च्या तेलाचे दर कमीच राहिले, तर पुढील काही आठवड्यांत इंधन दरात स्थिरता किंवा किरकोळ घट दिसू शकते.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number