पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरे कांस्य

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे कांस्य पदक जिंकले. मनू भाकर आणि सरबजोत सिंह या जोडीने दहा मीटर एअर पिस्तुल या नेमबाजीच्या खेळात मिश्र दुहेरी गटात कांस्य पदक जिंकले.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरे कांस्य

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे कांस्य पदक जिंकले. मनू भाकर आणि सरबजोत सिंह या जोडीने दहा मीटर एअर पिस्तुल या नेमबाजीच्या खेळात मिश्र दुहेरी गटात कांस्य पदक जिंकले. त्यांनी दक्षिण कोरियाच्या जोडीचा पराभव केला. याआधी मनू भाकरने महिलांच्या गटातून दहा मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्य जिंकले. यामुळे एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला क्रीडापटू झाली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत दोन पदके जिंकली. ही दोन्ही कांस्य पदके आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number