औट घटकेचे पक्षप्रमुख ?

उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे किती दिवस पक्षप्रमुख पदावर राहणार असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. त्यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारी २०२३ ला संपणार आहे. सोमवारपूर्वी नवी नियुक्ती अपेक्षित आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगातली सुनावणी सोमवार ३० जानेवारीला गेल्याने पेच जन्माला आला आहे. सन २०१८ मध्ये पाच वर्षासाठी उद्धव यांची पक्षप्रमुख पदावर […]

औट घटकेचे पक्षप्रमुख ?

उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे किती दिवस पक्षप्रमुख पदावर राहणार असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. त्यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारी २०२३ ला संपणार आहे. सोमवारपूर्वी नवी नियुक्ती अपेक्षित आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगातली सुनावणी सोमवार ३० जानेवारीला गेल्याने पेच जन्माला आला आहे.
सन २०१८ मध्ये पाच वर्षासाठी उद्धव यांची पक्षप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती त्याची मुदत २३ जानेवारी २०२३ ला संपणार आहे. त्यामुळे आता मुदत संपल्यावरही उद्धव पक्षप्रमुख पदावर राहू शकणार का ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाण याबाबत शुक्रवारी २० जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद झाले. यानंतरची सुनावणी ३० जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी ३० जानेवारी २०२३ रोजी उद्धव गट आणि शिंदे गटाने आपापल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ लेखी उत्तर सादर करावे, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे, पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची उद्धव गटाची मागणी अधांतरीच राहिली असून त्यांना, ‘आधी लेखी उत्तर द्या, मग बघू’, असा सल्ला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळाला आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number