‘खालच्या पातळीचे राजकारण ठाकरे-पवारच करू शकतात’ – किरीट सोमय्या

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी फडणवीसांवर केला आहे. तसेच जयदीप राणासोबत देवेंद्र फडणवीसांचे काय संबंध? असा सवालही उपस्थित केला आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिकांवर टीका केली आहे.   ‘एवढ्या खालच्या पातळीवरचे आरोप […]

‘खालच्या पातळीचे राजकारण ठाकरे-पवारच करू शकतात’ – किरीट सोमय्या

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी फडणवीसांवर केला आहे. तसेच जयदीप राणासोबत देवेंद्र फडणवीसांचे काय संबंध? असा सवालही उपस्थित केला आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिकांवर टीका केली आहे.

  ‘एवढ्या खालच्या पातळीवरचे आरोप करण्याची नवाब मलिकांची कॅपेसिटी नाही, हे केवळ ठाकरे-पवारच करू शकतात’ अशी टीका सोमय्यांनी मलिकांवर केली आहे. तसेच कधी वानखेडेंचे नाव काढायचे तर, कधी अमृता फडणवीसांवर टीका, ही काय नौटंकी आहे? असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम नातेवाईकांच्या खात्यात जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ईडीच्या धाडीतून हे सिद्धही झाले. दरम्यान या प्रकरणातून लक्ष विचलीत करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप केले जात आहे. त्यामुळे अमृता फडणवीस आणि समीर वानखेडे यांच्यावर गलिच्छ राजकारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारच करू शकतात, असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number