नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणेंना न्यायालयाचा दणका मिळाला असून नितेश उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. आता, नितेश राणे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. दरम्यान नितेश राणेंना सत्र न्यायालयाचा दणका मिळाल्यामुळे त्यांना अटक होणार का? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व […]

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणेंना न्यायालयाचा दणका मिळाला असून नितेश उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. आता, नितेश राणे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. दरम्यान नितेश राणेंना सत्र न्यायालयाचा दणका मिळाल्यामुळे त्यांना अटक होणार का? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांना दिलासा मिळाला नाही. दरम्यान, तेथून निघताना न्यायालयासमोर पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी रोखली. यावेळी न्यायालयाबाहेर पोलीस आणि राणे समर्थक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. तसेच नितेश राणे यांना पुढील १० दिवस पोलीस कोठडी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असल्याची माहिती सरकारी वकिलाने दिली आहे.

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, उच्च न्यायालयानेसुद्धा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालायत धाव घेतली असून याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

काय आहे प्रकरण?

१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब हे करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असून परिणामी नितेश राणे यांची चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number