नेटफ्लिक्सला भारतातून 16 हजार कोटींचा फायदा

भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नेटफ्लिक्सने तीन वर्षांत देशातून तब्बल 16 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, असे नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारँडोस यांनी वेव्हज परिषदेत माहिती दिली होती.

नेटफ्लिक्सला भारतातून 16 हजार कोटींचा फायदा

मुंबई: नुकताच, 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' या पहिल्या हिंदी वेबसिरीजला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'सेक्रेड गेम्स' या हिंदी वेबसिरीजमध्ये अभिनेता सैफ अली खान, नवाझुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, राजश्री देशपांडे यांसारख्या कलाकारांनी साकारलेल्या उत्कृष्ट भूमिकेमुळे भारतीय प्रेक्षक याकडे आकर्षित झाले होते. तेव्हापासून भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नेटफ्लिक्सने 2021 ते 2024 या तीन वर्षांत देशातून तब्बल 16 हजार कोटी रुपयांचा (2 अब्ज डॉलर्सचा) नफा कमावला आहे, असे नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारँडोस यांनी वेव्हज परिषदेत माहिती दिली होती.

हेही वाचा: Met Gala 2025: शाहरुख, प्रियांकासह 'हे' स्टार्स रेड कार्पेटवर दाखवणार जलवा! कधी आणि कुठे आयोजित करण्यात येणार फॅशन इव्हेंट?

शनिवारी 'वेव्हज' परिषदेच्या तिसऱ्या दिवशी अभिनेता सैफ अली खानने टेड सारंडोस यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी नेटफ्लिक्सने भारतात केलेल्या गुंतवणुकीचा कसा फायदा झाला यावर चर्चा झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सच्या फायद्यांमुळे भारतीय निर्मिती कंपन्यांसाठी सुमारे 20 हजार कलाकार आणि तंत्रज्ञांना रोजगार मिळाला आहे. आतापर्यंत, नेटफ्लिक्सने देशभरातील जवळपास 90 शहरांमध्ये वेब सिरीजचे चित्रीकरण केले आहे आणि 150 भारतीय वेब सिरीज व वेब चित्रपटांची निर्मिती केली आहे.

गेल्या वर्षी, जगभरातील प्रेक्षकांनी नेटफ्लिक्सवर 3 अब्ज तासांचा भारतीय कंटेंट पाहिला. शिवाय, दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या दहा सर्वोत्तम वेबमालिका किंवा वेबपटांच्या यादीत एक भारतीय मालिका हमखास असायची, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number