‘नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायला पाहिजे’ – प्रवीण दरेकर

  राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मलिकांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे.   प्रवीण दरेकर म्हणाले, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे पातळी सोडून बोलत आहेत. त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मंत्रीपदाची […]

‘नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायला पाहिजे’ – प्रवीण दरेकर

  राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मलिकांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे.

  प्रवीण दरेकर म्हणाले, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे पातळी सोडून बोलत आहेत. त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मंत्रीपदाची शपथ घेताना तुम्ही कोणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावू नये असे संकेत आहेत. नवाब मलिक यांना शिवसेना आणि इतर सर्व पक्षांची मूकसंमती असल्याचे विधान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

 हे सुद्धा वाचा – ‘खालच्या पातळीचे राजकारण ठाकरे-पवारच करू शकतात’ – किरीट सोमय्या

  मलिकांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. रोज सकाळी कुठलातरी फोटो ट्विट करत आरोप करायची त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसांत दिसत आहे. समीर वानखेडे मुस्लिमच आहेत असा हट्टाहास कशासाठी? त्यामुळे नवाब मलिकांनी शपथेचा भंग केला आहे, आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number