M S Dhoni: "बुमराहबद्दल काही बोलण्याची गरज नाही…" विजयानंतर धोनीने कोणाचे कान टोचले आणि कोणाचे कौतुक केले? वाचा सविस्तर

भारताने टी-20 विश्वचषक 2026 जिंकत इतिहास रचल्यावर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर केला.

M S Dhoni: &quotबुमराहबद्दल काही बोलण्याची गरज नाही…" विजयानंतर धोनीने कोणाचे कान टोचले आणि कोणाचे कौतुक केले? वाचा सविस्तर

नवी दिल्ली: आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकत भारतीय संघाने क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर भारताचे नाव कोरले आहे. विशेष म्हणजे, आपल्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच एखाद्या संघाने हा किताब जिंकण्याची कामगिरी केली, तसेच सलग दोनदा टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरण्याचा मानही भारताने मिळवला.

या ऐतिहासिक विजयाच्या काही क्षणांनंतर भारतीय क्रिकेटमधील दिग्गज महेंद्रसिंह धोनी याने सोशल मीडियावरील त्याची दीर्घ मौन सोडले आहे. त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे मनापासून अभिनंदन करत एक भावनिक संदेश शेअर केला. अंतिम सामन्यादरम्यान धोनी हा रोहित शर्मा आणि जय शाह यांच्यासोबत व्हीव्हीआयपी बॉक्समध्ये उपस्थित होता. सामन्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.

धोनीने संदेशात लिहिले की, “कोच साहेब, तुमचा हसरा चेहरा खूप छान दिसत आहे. या विजयासोबत तुमचे हसू अधिकच सुंदर वाटते. खूप छान काम केले.” या संदेशातून त्याच्या शब्दांतील आपुलकी स्पष्ट दिसून येत होती. त्यांनी पुढे भारतीय संघ, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांचेही अभिनंदन करत अहमदाबादमध्ये इतिहास घडल्याचे नमूद केले.

हेही वाचा: Sanju Samson On Sachin Tendulkar : क्रिकेटच्या देवाकडून मिळाले धडे…; मॅचच्या आधी संजू सॅमसनचा सचिन तेंडुलकरशी झाला होता संपर्क, भावूक होत सगळं काही सांगितलं

धोनीने केलेल्या “कोच साहेब” या उल्लेखामुळे गौतम गंभीर याच्याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. गौतम गंभीर याची गंभीर आणि शांत प्रतिमा नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. मात्र त्याच्या विजयावर केलेल्या धोनीच्या हलक्या-फुलक्या टिप्पणीमुळे 2007 च्या विजेत्या संघातील खेळाडू आणि 2026 च्या विजेत्या संघामधील एक भावनिक दुवा निर्माण झाल्याचे अनेकांनी म्हटले. धोनी आणि गंभीर यांच्यात मतभेद असल्याच्या अफवा अनेकदा पसरल्या असल्या, तरी दोघांनी वेळोवेळी त्या चुकीच्या ठरवल्या आहेत.

दरम्यान, धोनीने भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचेही विशेष कौतुक केले. अंतिम सामन्यात बुमराहने न्यूझीलंडच्या फलंदाजांना अक्षरशः गुडघ्यावर आणत चार विकेट्स घेतल्या. त्यांच्या कामगिरीनंतर धोनी याने पोस्टमध्ये लिहिले, “बुमराहबद्दल काही लिहिण्याची गरज नाही… तो खरा चॅम्पियन गोलंदाज आहे.” या शब्दांतून त्याने बुमराहच्या प्रभावी गोलंदाजीचे मनापासून कौतुक केले.

हेही वाचा: Share Market Today : आठवड्याच्या सुरूवातीलाच रेड अलर्ट! सेन्सेक्स 1800 अंकांनी तर निफ्टी 550 अंकानी घसरला, गुंतवणूकदारांचा डोक्याला हात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number